shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबाजोगाई नगरपरिषद अध्यक्षपदासाठी अक्षय मुंदडा प्रबळ दावेदार! "मी येतोय आपल्या सेवेत"...अक्षय मुंदडा !!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आता अत्यंत रंगतदार होणार आहे. ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच, सोमवारी, दि. ०६ ऑक्टोबर रोजी नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत अध्यक्षपद अखेर खुल्या प्रवर्गासाठी (General Category) आरक्षित झाले. ओबीसी आरक्षणाची चर्चा असताना अचानक खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला, मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.



​प्रमुख लढत आणि दावेदार

​अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे अनेक नवे चेहरे आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या अंबाजोगाईच्या राजकारणात दोन प्रमुख पक्ष आणि दोन नेत्यांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत:

​भारतीय जनता पक्षाकडून (भाजप): युवा नेते आणि पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैय्या मुंदडा यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

​राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) कडून: माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे प्रबळ दावेदार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

​याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आय, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट) आणि रिपाई या पक्षांचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरतील.

​अक्षय मुंदडा यांच्या नावाची चर्चा

​अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला सुटल्याची अधिकृत माहिती मिळताच, भाजपच्या तरुण फळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अक्षय मुंदडा यांच्या नावासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. "अक्षय भैय्या फिक्स, लागा कामाला" असा ट्रेंड चालवण्यात आल्यामुळे त्यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आले आहे.

​युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नवयुवकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सध्या शहरात "आपला माणूस कामाचा माणूस, आपला भैय्या अक्षय भैय्या" हा ट्रेंड जोर धरत आहे.

​जमेच्या बाजू

​अक्षय मुंदडा यांच्याकडे अनेक जमेच्या बाजू आहेत, ज्यांचा अंबाजोगाईकर विचार करतील:

​वारसा आणि पाठबळ: स्व. विमलताई मुंदडा यांची पुण्याई आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व आमदार सौ. नमिता मुंदडा यांची खंबीर साथ त्यांना मिळणार आहे.

​तरुणांचे समर्थन: त्यांना शहरातील तरुणांचे भक्कम पाठबळ लाभले आहे.

​विकासकामांचा आधार: त्यांनी आमदार सौ. नमिता मुंदडा यांच्या विकासनिधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून शहराचा केलेला कायापालट ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

​राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेमुळे आणि अक्षय मुंदडा यांच्या "मी येतोय आपल्या सेवेत..." या घोषणेमुळे अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

close