प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बीड शहर व तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बीड येथे पार पडली.
या बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे आणि पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असे स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस काँग्रेसचे बीड विधानसभा निरीक्षक अन्वर देशमुख, प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप, तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, शहर अध्यक्ष परवेझ खुरेशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली.
बीड जिल्ह्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.