मखदूम सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन यांचा संयुक्त स्तूत्य उपक्रम
श्रीमंती,सौंदर्य किंवा ओळख या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि संस्कार आहे - युनुसभाई तांबटकर
श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष स्वप्न आणि साध्य यांचं अद्भुत मिश्रण होतं. गरीब कुटुंबातून आलेला मुलगा भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचं वाक्य आजही प्रेरणा देतं "स्वप्न ते नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत."आज मखदूम सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनतर्फे जे वह्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या त्या केवळ वह्या नाहीत, तर त्या ज्ञानाची बियाणी आहेत. त्या प्रत्येक पानावर तुम्ही तुमचं भविष्य लिहू शकता. शिक्षण हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. श्रीमंती, सौंदर्य किंवा ओळख या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि संस्कार आहे.
तुमच्याकडूनच पुढचं समाजाचं भविष्य घडणार आहे. त्यामुळे अभ्यासाला केवळ गुण मिळवण्यासाठी नव्हे, तर समाजासाठी काही करण्यासाठी करा.असे प्रतिपादन रहमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती, ‘भारताचे मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्गा दायरा याठिकाणी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम इंडिया बेकर्स, अल करम सोसायटी आदींच्या सहकार्याने पार पडला.
या प्रसंगी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसमाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सहसचिव डॉ.कमर सुरुर, शाळेचे मुख्याध्यापक फैय्याज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कमर सुरुर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, अभ्यासाची पद्धत आणि डॉ.कलाम यांच्या आयुष्याचा आदर्श कसा घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले.शाळेच्या शिक्षिका शेख शाकेरा यांनी प्रास्ताविक करून वर्षभर शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीम शेख यांनी तर आभारप्रदर्शन शेख ताहेरा यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111