पुणे, दिनांक — पुण्यात नुकताच संपन्न झालेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) – प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग PROTAN यांच्या ७व्या राज्यस्तरीय अधिवेशनात जनता विद्यालय, आंगवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील शिक्षकेतर कर्मचारी रणजित रविंद्र पवार यांचा “कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत कर्मचारी” असा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामनजी मेश्राम यांच्या शुभ हस्ते पवार यांना सप्रसन्न मनाने प्रदान करण्यात आला.
रणजित पवार हे त्यांच्या शाळेत शिस्तप्रिय, कार्यतत्परक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे कर्मठ कर्मचारी म्हणून परिचित आहेत. शाळा, समाज आणि शिक्षण क्षेत्रात ते सातत्याने पुढाकार घेत विविध उपक्रम राबवतात. त्यांच्या निष्ठा, मेहनत आणि सत्यनिष्ठेच्या प्रेरणादायी वृत्तीला राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे.
या यशामुळे स्थानिक समाजमाध्यमे, शाळेतील सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
“मेहनत, निष्ठा आणि समाजभाव — यशाची खरी ओळख रणजित पवार!” — अशी कौतुकाची आठवण या प्रसंगी सर्वत्र ऐकायला मिळते.