पुणे - अखिल वडार बोली भाषा साहित्य संस्था, कोल्हापूर व अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्तपणे *तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन -२०२५* हा कार्यक्रम रविवार दिनांक -२६-१०-२०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.०० वा. या वेळेत *साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंग मंदिर येरवडा विमानतळ रोड, गुंजन टाकीजवळ, पुणे* आयोजित केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असुन त्यानंतर *सांस्कृतिक कला सादरीकरण* मध्ये वडार समाजाच्या पारंपरिक पद्धतीने गायन, मिमिक्री, नृत्य, शाहिरी इत्यादी होत आहे. उद्घाघाटक व वडार समाजाच्या उत्कृष्ट केलेले शैक्षणिक, सामाजिक, खेळ, क्रीडा, कलाकार व्यक्तीचे सन्मान पुरस्कार या कार्यक्रमात होणार आहे.मराठी साहित्यात चित्रित झालेले वडार समाजाचे चित्रण व आरक्षण या विषयावर परिसंवाद होत आहे पुस्तके प्रकाशन बरोबर कवी संमेलन होणार आहे
*उदघाटन शुभहस्ते -* मा श्री मनोहर बंदपट्टे साहेब, अप्पर सचिव -पर्यावरण, मंत्रालय, मुंबई होत असून *विशेष उपस्थिती -* मा. श्री. बापूसाहेब तुकाराम पठारे आमदार वडगाव शेरी विधानसभा संघ, आणि मा. श्री. अमितजी गोरखे आमदार विधान परिषद पुणे उपस्थित राहणार आहेत.
*यंदाचे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* प्रक्षोभकार - डॉ. प्रा. प्रकाश जाधव अहिल्यानगर, *स्वागत अध्यक्ष -* मा. श्री. सिताराम बुधाजी शिंदे छ. संभाजीनगर, प्रसिद्ध उद्योजक व *प्रमुख वक्ते -* मा. प्रा. गुलाब वाघमोडे पुणे हे आहेत.
*मावळते अध्यक्ष -* वेदनाकार मा. श्री. टी एस चव्हाण छ. संभाजीनगर ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत व मा. प्रा. शशिकांत जाधव हे उपस्थित राहणार आहेत.
*प्रमुख उपस्थिती -* मा. श्री. सुरेश धोत्रे माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे, मा. श्री. मुकारी अण्णा अलगुडे मा. उपमहापौर पुणे नगर पालिका पुणे आणि *प्रमुख पाहुणे-* पुण्याचे माजी नगरसेवक/नगरसेविका मा.किशोर विटकर मा सतीश धोत्रे, मा. शारदाताई ओरसे, मा निताताई मंजाळकर मा अपर्णा कुऱ्हाडे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेविका संगीता पवार, पंढरपूरचे माजी नगरसेवक मा. अंबादास धोत्रे, मा. महादेव धोत्रे, मा. धर्मराज घोडके आणि समाजाचे नेते सर्वश्री मा. दयानंद इरकल, अध्यक्ष- वडार पॅन्थर संघटना पुणे, मा. शंकर अण्णा चौगुले, राज्य उपाध्यक्ष - मी वडार महाराष्ट्राचा, सोलापूर, मा. जगन्नाथ फुलारे, प्रदेश अध्यक्ष - वडार समाज संघ, छ. संभाजीनगर मा. डॉ. श्रावण रॅपनवाड, प्रदेश सचिव - काँग्रेस आय, नांदेड, मा. अनिल जाधव, राज्य उपाध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी, मा. कु. संगीता पवार, महिला अध्यक्ष - भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती माजी कार्यक्रम अध्यक्ष श्री टी एस चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत छ संभाजीनगर यांनी दिले

