श्रीरामपूर / प्रतिनिधी:
बळीराजा सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने बलीप्रतिपदेनिमित्त सम्राट बळीराजाचे पूजन करून शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून होऊन ढोल ताशाच्या गजरात तथा सम्राट बळीराजाच्या गौरवाच्या घोषणांनी मिरवणूक शहरातून मुख्य रस्त्यावरून आझाद मैदान या ठिकाणी आल्यानंतर अभिवादन सभेने या मिरवणुकीचा समारोप झाला.
यावेळी भारतीय कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे, विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे , भाकप माले संघटनेचे नेते जीवन सुरडे , दत्तनगर चे माजी सरपंच पी. एस. निकम ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले , संभाजी ब्रिगेडचे डॉ.अरविंद बडाख, शेतकरी संघटनेचे सुरेश टाके, विद्रोही संघटनेचे डॉ.सलीम शेख ,आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे ज्ञानेश्वर भंगड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲड. राजेश बोर्डे, सुधाकर बागुल, फ्रान्सिस शेळके,अनिल गायकवाड, भागवत विधाटे, अरुण बर्डे, सुभान पटेल,राजू लोंढे , अमोल सोनवणे, राहुल दाभाडे,विक्रम कोरडेवाल, दिपक शेळके, संदीप राऊत, राहुल मेहत्रे,शाहीर भीमराव कदम, बाबासाहेब थोरात, सुरेश गवई, संतोष केदार, नारायण शेलार,सागर भिसे, अस्लम शेख,जीवन बोकफोडे, विलास शेळके, रवी बोर्डे ,राजेश हिवाळे, दिलीप त्रिभुवन,उत्तमराव शेलार ,किरण खंडागळे ,रवी अण्णा गायकवाड आदि उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

