लातूर/ प्रतिनिधी :
वडार जमातीला अनुसूचित जमाती (एसटी ब) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी लातूर जिल्हा सकल वडार समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
वडार समाजाने अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा सामना केला असून, त्यांना अद्यापही मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना एसटी ब आरक्षणात समाविष्ट करून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले की, वडार समाज एसटी प्रवर्गाचे निकष पूर्ण करत असूनही स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही वडार समाजाला घटनात्मक आरक्षण नाही, ही फार मोठी शोकांतिका पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची झाली आहे. वडार समाजाची पारंपरिक जीवनशैली, व्यवसाय, राहणीमान, व शिक्षणाची पातळी ही अनुसूचित जमातींप्रमाणेच असून, शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. तसेच वडार जमातीला भारतातील वेगवेगळ्या राज्यात घटनात्मक आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्रात वडार जमातीवरती अन्यायकारक (Vjnt) विमुक्त-भटका प्रवर्ग लादण्यात आला आहे. यावेळी लातूर जिल्हा सकल वडार समाजाच्या वतीने वडार जमातीला 'एसटी ब' प्रवर्गात आरक्षण मिळाले पाहिजे असे एकमुखाने मागणी करण्यात आली.
याप्रसंगी अर्जुन धोत्रे सर, बाबुराव शेल्हाळे, श्रीकांत मुद्दे, व्यंकट जाधव, प्रा.संजय शिंदे, रमाकांत इरकल, प्रा.तिमन्ना माने, गोविंद धोत्रे, विलास धोत्रे, सूर्यकांत मुद्दे, सोनबा मुद्दे, राजेंद्र भांडेकर, राजेंद्र जाधव,शंकर विटकर, राजू भांडेकर आदी वडार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकांत मुद्दे, लातूर
मो.9823360226

