shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काकर समाजाच्यावतीने लवकरच जळगांव मध्ये भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन !

उत्कृष्ट कार्य असणाऱ्यांचा सन्मान ; माहिती पाठविण्याचे प्रदेशाध्यक्ष काकर यांचे अवाहन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्र काकर समाज संघटना राज्य कार्यकारणी ची सभा नुकताच जळगांव याठिकाणी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी काकर समाज संघटने चे प्रदेशाध्यक्ष तथा वैजापुर नगर पालिके चे माजी नगरसेवक हाजी बिलाल हुसैन काकर हे होते. या बैठकीत काकर समाजातील शैक्षणिक प्रगति विषयी चर्चा करण्यात आली. सामाजातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण यासोबतच शैक्षणिक विषयी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागळातील सर्वात शेवटच्या उपेक्षित
घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच जळगांव मध्ये भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष बिलाल काकर यांनी दिली.

याप्रसंगी जळगांव चे निसार मेहबूब काकर,मुस्ताक गुलाब काकर, तौसीफ शरीफ काकर, मोहम्मद असीम सर, रियाज वजीर काकर, अंजुमन तालीमूल मुस्लिम हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक फारूक अमीर काकर, माजी मुख्याध्यापक तथा इन्कलाब उर्दू पत्रिकेचे वरिष्ठ पत्रकार मुश्ताक करीमी काकर, मुख्याध्यापक इस्माईल सुलेमान काकर आणी श्रीरामपूर चे इकबाल इस्माईल काकर सर आदि उपस्थित होते. 

         यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमीच्या वतीने मुश्ताक करीमी काकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व पत्रकारिता पुरस्कार तसेच श्रीरामपूर येथील काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा अलमिजान उर्दू शाळेचे शिक्षक इकबाल इस्माईल काकर यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र काकर समाज संघटनेच्या वतीने त्यांचा शाल,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

       काकर समाजाची अधिकाधिक शैक्षणिक प्रगती व्हावी याकरिता तसेच सामाजातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन तथा प्रोत्साहन देण्यासाठी काकर समाज संघटनेच्या वतीने लवकरच जळगांव येथे भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन  करण्यात येणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.यासोबतच या शैक्षणिक फेस्टिव्हलमध्ये, सामाजातील शिक्षण क्षेत्रातील राज्यभरात उत्कृष्ट कामगीरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे प्रोत्साहनपर सत्कार,सन्मान करण्यात येणार असल्याने, ज्यांचे कार्य आणी कामगीरी उत्तम आहे अशा मान्यवरांनी 
इकबाल इस्माईल काकर सर, इस्माईल सुलेमान काकर, मुशताक करीमी, फारुख काकर सर यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती प्रत्येक जिल्ह्यातून त्यांच्याकडे पाठवावी असे आवाहनही महाराष्ट्र काकर समाज संघटना प्रदेशाध्यक्ष बिलाल हुसैन काकर यांनी केले आहे.

*वृत्त प्रसिद्ध सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

close