shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मैदानी स्पर्धेत रयत संस्थेच्या कदम विद्यालयाच्या खेळाडूंची बाजी.

मैदानी स्पर्धेत रयत  संस्थेच्या कदम विद्यालयाच्या खेळाडूंची बाजी.
 इंदापूर : क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व  इंदापूर तालुका क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करून इंदापूर तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. तर वेगवेगळ्या खेळ प्रकारामध्ये सोळा खेळाडूंची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे.
*14 वर्षाखालील मुली*
*4*100 मी रिले* -द्वितीय
सहभागी खेळाडू
 संस्कृती जाधव, ईश्वरी देवकर, कीर्ती बोराटे, अमृता फोंडे, श्रावणी वाघमारे 
 *उंच उडी*-गायत्री शिंदे-तृतीय.
   *17 वर्षाखालील मुली* *4*100मी रिले संघ* -प्रथम क्रमांक
सहभागी खेळाडू-तृप्ती बोराटे, भक्ती बोराटे, श्रेया मखरे, धनश्री खरात,भक्ती कुंभार
*100 मी धावणे*-तृप्ती बोराटे-द्वितीय
*उंच उडी* -भक्ती कुंभार -द्वितीय
*हातोडा फेक* -गौरी माने-तृतीय
*400मी धावणे* -भक्ती बोराटे-तृतीय
*100मी हार्डल्स*-श्रेया मखरे द्वितीय
*17 वर्षाखालील मुले*
*100मी.धावणे*-साईराज गायकवाड-द्वितीय
*4*100 मी रिले व 4*400 मी रिले*- तृतीय
सहभागी खेळाडू-साईराज गायकवाड, आयान बागवान, शिवम नामदास, आदर्श रजपूत
*19 वर्षाखालील मुली* 
*4*400मी रिले*- प्रथम 
 सहभागी 
 सानिका नलावडे, सानिका शेंडे, सानिका तरंगे, शितल तरंगे,ऋतुजा राऊत
*उंच उडी*-सानिका शेंडे-तृतीय
*हातोडा फेक*-सिद्धी भोंग-तृतीय
*19 वर्षाखालील मुले* *400 मी हार्डल्स* -उमर कोरबू -प्रथम व 400मी धावणे तृतीय
*क्रॉस कंट्री* -सुदर्शन कचरे-द्वितीय
*तिहेरी उडी*आदर्श शिंदे
*4*400 मी रिले*-तृतीय सहभागी खेळाडू-उमर कोरबू, सुदर्शन कचरे,आदर्श शिंदे, रणजित धेंडे.
 वरील सर्व खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार शिंगारे, पर्यवेक्षिकापुष्पा काळे, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर  बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आणि जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close