🌾
अकोले (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील पैठण येथील जुन्या पिढीतील आदर्श व मेहनती शेतकरी रंगनाथ तुळशीराम तळेकर (वय ८३) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
स्वतःच्या परिश्रमावर शेती करून आदर्श जीवन जगलेल्या तळेकर यांनी आयुष्यभर शेती, कुटुंब आणि समाज यांचा उत्तम समतोल राखला. गावातील अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले असून त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
त्यांच्या पश्चात दोन मुले सोमनाथ तळेकर, बाळासाहेब तळेकर, एक मुलगी वंदना घोलप, पत्नी आणि नातवंड असा परिवार आहे.
वरचे पैठण येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
गावात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून “एक आदर्श शेतकऱ्याचा युगपुरुष हरपला” अशी भावना व्यक्त होत आहे.