अहिल्यानगर(प्रतिनिधी):-
राहुल बाजीराव ढेंबरे हा युवक साकुर पठारभागातील बिरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित तरुण असून कुठलाही राजकीय वसावारसा नसताना देखील जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण, वेळोवेळी घेतलेल्या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना स्वराज्यप्रेमी युवकांच्या साथीने ०३ फेब्रुवारी २०१८ रोजी करून खऱ्याअर्थाने सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले आणि खऱ्याअर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारे असंख्य युवक युवती संघटनेला जोडले जाऊन सामाजिक लढ्याची धार आणखीच तीव्र झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे करत आहेत.
गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम,
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांग तसेच विधवा महिलांसाठीच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी मशाल मोर्चा, संपुर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको, विजेसंदर्भातील- धोकादायक स्थितीतील पोल दुरुस्ती, नविन विज कनेक्शन, सौर कृषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, पिक विमा संबंधित अडीअडचणी, शेतकरी अपघात विमा, बळीराजावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम... वर्षभरात अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारे बिबटहल्ले चिंतेचा विषय बनला आहे. सध्याची बिबट्याची दहशत मोडुन काढण्यासाठी जनजागृती तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि मंत्रीमहोदयांपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या तिव्र भावना पोहचवून नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारणे, तसेच इतर उपाययोजना तातडीने करण्याची मागणी.
उपोषण आणि विविध आंदोलने... ग्रामीण भागातील पाणी, साकुर पठारभागातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिकेबरोबरच जिल्हा परिषद, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेगवेगळी आंदोलने त्यामध्ये रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षलागवड आंदोलन, रास्ता रोको, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा काळ्या रंगाच्या शालीं टाकून उपरोधिक सत्कार, आमरण उपोषण यामाध्यमातून संबंधित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात यश.
नेटवर्क- भारत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही नेटवर्क पासून वंचित असणाऱ्या साकुर पठारभागातील बहुतांश गावांच्या नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी थेट दूरसंचार मंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवण्यात मोलाचे योगदान,
आरोग्य -जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून सर्वसामान्य रुग्णांना योग्यप्रकारे सुविधा मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील.
रुग्णांना दैनंदिन वैद्यकीय मदतीबरोबरच आरोग्यविषयक योजना, मुख्यमंत्री/प्रधानमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांची मदत मिळवून देणे, वैद्यकीय मदतीसंबंधी विविध योजनांची जनजागृती, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे उत्कृष्ट काम, मराठा आरक्षण विषयी स्पष्ट आणि आग्रही भुमिका,
गावागावातील, कुटुंबातील, जिवलग मित्रांतील अगदी किरकोळ कारणावरून होणारी भांडणे आणि त्याचे राजकीय भांडवल बनवणा-या काही विघ्नसंतोषी राजकारणी लोकांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करु नये, अगदी या गोष्टींना आळा घालण्यासाठी जो चुकतोय, त्याची त्याच ठिकाणी कान उघाडणी करून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी सदैव प्रयत्नशील...
ख-याअर्थाने शिवछत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होऊन वेळोवेळी चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची मानसिकता, वेळप्रसंगी कधीकधी एखाद्या मोठ्या हस्तीलाही नडण्याचे सामर्थ्य...
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती शंभुराजे आणि सर्वच महापुरुषांचे जीवनचरित्र शालेय अभ्यासक्रमात जास्तीत जास्त प्रमाणात समाविष्ट करावे तसेच स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सामाजिक तेढ निर्माण होईल अशापद्धतीने महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका, विविध आंदोलनांमध्ये सहभाग.
विविध सामाजिक उपक्रम
छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, विविध सामाजिक उपक्रम, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मोत्सवानिमीत्त वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाबरोबरच शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना तळागाळातील माताभगिनींपर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी शिबिरांचे आयोजन, तसेच विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या शिबीरांचे आयोजन, गडकिल्ले स्वच्छता मोहीम, शालेय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा माहित व्हावा यासाठी दरवर्षी गड किल्यांवर सहलीचे आयोजन.
सामाजिक शिवकार्याचा गौरव...
यामध्ये राज्यस्तरीय ४ तसेच राष्ट्रीय पातळीवरील २ पुरस्कारांचा समावेश आहे.
१) राज्यस्तरीय आदर्श युवा समाजरत्न पुरस्कार-२०२१,
२) राज्यस्तरीयआदर्श समाजसेवक-२०२२,
३) राज्यस्तरीय आदर्श जनसेवक-२०२३,
४) राष्ट्रीय पातळीवरील इंडियन युथ आयकॉन पुरस्कार-२०२३,
५) राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०२५,
६) राज्यस्तरीय सामाजिक युवा आयडॉल पुरस्कार-२०२५
वेळप्रसंगी सामाजिक प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनाही भिडण्यास मागेपुढे न पाहणारा,
सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही असो, तळागाळातील सामाजिक काम एकदा हातात घेतले की त्याला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळी ते वरिष्ठ पातळीवर न्याय मिळेपर्यंत अखंड पाठपुरावा करणारा आणि ज्यांचे सहकार्य मिळाले त्यांचा विसर न पडता वेळोवेळी उल्लेख करणारा तसेच ज्यांच्याकडून सहकार्य झाले नाही त्यांच्याबद्दल शब्दही न काढणारा हा आगळावेगळा युवक म्हणजे राहुल बाजीराव ढेंबरे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद- साकुर गटातील प्रश्नांची इतंभूत माहिती, सामाजिक प्रश्नांची जाणीव, दांडगा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी जपत असताना सर्वांशी असणारे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध, गावोगावी असणारा प्रचंड मोठा मित्रपरिवार, विवीध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वीपणे वेळोवेळी केलेली जन आंदोलनं तसेच यशस्वी पाठपुरावा या जमेच्या बाजू आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना आपण बघतो एकीकडे निवडणुकीत होणारा पैशांचा बेसुमार वापर, त्यात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राहुल बाजीराव ढेंबरे हे लोकवर्गणीतून निवडणुकीला सामोरे जात असताना गटातील प्रत्येक मतदारांकडून एक-एक रूपया घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. यामाध्यमातून एकप्रकारे प्रत्येक मतदार आणि राहुल बाजीराव ढेंबरे यांच्यातील संबंध आणखी घट्ट होतील.
वैद्यकीय मदत, पोलीस स्टेशन, शेक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मदतीसाठी अगदी कुठलाही आर्थिक हितसंबंध न ठेवता शुन्य रुपयांत गोरगरिबांच्या वेळप्रसंगी धावून येणारा हक्काचा माणुस म्हणून राहुल बाजीराव ढेंबरे यांची ओळख निर्माण झाली आहे.
राहुल बाजीराव ढेंबरे यांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळते कि अपक्षच लढणार... हे चित्र येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईलच.
000

