“भाजप पिंपळनेर शहर मंडळ उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार नानासो दिलीप घरटे”
सामोडे येथील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार नानासो दिलीप घरटे यांची भाजपा पिंपळनेर शहर मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षनिष्ठेने कार्यरत असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी सामोडे गावात रोवलेले पक्षाचे रोपटे आज भक्कम वृक्षाच्या रुपात उभे आहे.
पक्षवाढीच्या सुरुवातीच्या काळात सामोडे गावात केवळ दोन कार्यकर्त्यांचे योगदान पक्षाला आधार देणारे ठरले—कै. विलास घरटे आणि नानासो दिलीप घरटे. या दोघांनी पक्षकार्य अविरत आणि निष्ठेने सुरू ठेवले.
दिलीप घरटे हे सामोडे-पिंपळनेर परिसरातील ज्येष्ठ पत्रकार असून पिंपळनेर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, साईबाबा पाणी वाटप संस्थेचे चेअरमन, तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम पाहिले आहे. विविध सामाजिक, पत्रकारितेतील आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची भाजप पिंपळनेर शहर मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंचक्रोशीतील सर्वच स्तरातील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांकडून त्यांच्या नियुक्तीचे अभिनंदन व कौतुक होत आहे. नुकताच शिर्डी येथे साई संस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादासो तसेच पत्रकार संजय महाजन, पुष्पराज नाहीरे, विशाल रायते, ठगूबाई जिरे, विमलताई इंगळे, निमाताई नाहीरे, शोभा महाजन, शालिनी घरटे, निकिता घरटे यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

