प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
अंबाजोगाई नगर पालिका निवडणुका लांबल्यामुळे प्रशासकीय कार्यकाळात आमदार नमिता मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंदडा कुटुंबाने अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी केलेले कार्य आता स्पष्टपणे दिसून येत आहे. "न भूतो न भविष्यति" असा निधी खेचून आणत मुंदडा कुटुंबाने शहराचा कायापालट केला असल्याचा विश्वास अंबाजोगाईचे नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासकीय काळात अंबाजोगाई शहरातील रस्ते काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा योजना, नाली बांधकाम, पथदिवे आणि स्वच्छता मोहिमांसारखी अनेक मोठी विकासकामे मार्गी लागली आहेत. नुकतेच ऐतिहासिक योगेश्वरी मंदिर परिसरातील उद्यान सुशोभीकरणाचे भूमिपूजनही संपन्न झाले, जे शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे.
न भुतो न भविष्यति निधी आणि विकास!
उत्कृष्ट नियोजन: मुंदडा कुटुंबीयांनी योग्य नियोजन आणि पारदर्शक कारभारावर भर देत विकासकामांना गती दिली.
सर्वांगीण विकास: रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये ठोस उपाययोजना राबवल्या.
'आदर्श शहर' ध्येय: अंबाजोगाईला राज्यातील एक आदर्श शहर बनवण्याचे ध्येय मुंदडा गटाने नागरिकांसमोर ठेवले आहे.
'नंदकिशोर काकाजीं'ना नगराध्यक्ष करण्याची हाक!
शहराच्या या विकासकामांची दखल घेत, आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व आदरणीय श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या बाजूने वातावरण निर्माण झाले आहे. "आता नाही, तर कधीच नाही!" (अभि नही तो कभी नही!) अशा घोषणा देत नागरिक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत. शहरातील रहिवासी उघड्या डोळ्यांनी हा विकास पाहत असून, नगरपालिका आपल्या हाती दिल्यास शहर नव्या रुपात दिसेल, हा आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केलेला विश्वास आता पूर्णत्वास येताना दिसत आहे.
नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबेजोगाई शहराच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी, या निवडणुकीत नंदकिशोर (काकाजी) मुंदडा हेच नगराध्यक्ष होणार असा ठाम विश्वास मुंदडा समर्थकांनी व्यक्त केला आहे.


