shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सणसर - लासुर्णे जि.प.मतदार संघाची निवडणूक मोठी निर्णायक ठरणार !

पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास निवडणुकीत 
ॲड.पुजा भिसे नक्कीच बाजी मारणार !!

सणसर - लासुर्णे जि.प. मतदार संघात राष्ट्रवादी कडून ॲड.पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत जोरदार चर्चा 

शौकतभाई शेख / श्रीरामपूर 
इंदापूर - जिल्हा परिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सणसर - लासुर्णे मतदार संघात इंदापूर तालुक्याच्या बेलवाडी येथील ऍडव्होकेट पूजा लक्ष्मण भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

ॲड.पूजा भिसे या उच्चशिक्षित पदवीधर नामांकित विधीज्ञ (वकील) असुन त्यांचे वडील लक्ष्मण संभाजी भिसे हे सामाजिक कार्यकर्ते तथा नामवंत ज्येष्ठ पत्रकार व स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणी सलग १५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या "भवानीमाता" या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक देखील आहेत, तसेच पत्रकारीते सोबत पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात देखील त्यांचे मोठे योगदान  असल्याने इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्यांवर त्यांची केवळ चांगली ओळखच नव्हेतर चांगुलपणाची देखील एक छाप असल्याने
शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.  अजितदादा पवार आणि राज्याचे कृषीमंत्री नाम. दत्तात्रय भरणे मामा यांचे ते गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून एकनिष्ठ खंदे समर्थक म्हणून सर्वत्र परिचित असल्याने त्यांच्या सुकन्या ॲड.पुजा भिसे यांना निवडणुकीत मोठे पोषक वातावरण मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

सणसर - लासुर्णे हा मतदार संघ राजकीय दृष्ठ्या इंदापूर तालुक्यात नावाजलेला मतदार संघ म्हणून प्रसिद्ध आहे, या मतदार संघातील नागरिक सुज्ञ आहे, हा मतदार संघ इंदापूर तालुक्याचे कार्य सम्राट कृषीमंत्री नाम.दत्तात्रय भरणे मामा यांना मानणारा मतदार संघ आहे, ऍडव्होकेट पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी,मतदार यांच्यासोबत चर्चा आणि गाव भेटी दौरे सुरु केले आहेत,यातून नागरिकांकडून 
त्यांना उत्तमरित्या चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याने,तथा त्यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी चे काही प्रमुख पदाधिकारी आणी खंदे समर्थक कार्यकर्ते नाम. दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे ॲड.पुजा भिसे यांच्या उमेदवारीबाबत अग्रह धरणार असल्याने सणसर - लासुर्णे मतदार संघात यावेळी उच्चशिक्षित पदवीधर महिला वकील बाजी मारणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.कारण कृषिमंत्री नाम.दत्तात्रय भरणे मामा हे निश्चित ॲड.पूजा भिसे यांच्या उमेदवारीबद्दल योग्य निर्णय घेणार असल्याचे मतदारसंघात दबक्या आवाजात परंतु जोरदार चर्चा सुरू आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close