shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांना दिला मदतीचा हात.

इघे कुटुंबीयांसाठी समाज बांधवाचा पुढाकार.

वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे) :-  दोन महिन्यांपूर्वी लोहार समाजातील सचिन बबन इघे,खडकवाडी(पारनेर)वय २९ वर्ष या कर्त्या पुरुषाचे ११ आक्टोंबर रोजी अपघात निधन झाले.इघे कुटुंबीयांपुढे दुःखाचा डोंगर उभा राहिला. संसार उघड्यावर पडला. दुर्दैवाने आर्थिक अडचणीत सापडले.प्रामुख्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या प्रमुख व्यक्ती अपघातात हिरावून घेतल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले.यामध्ये कोल्हापूर येथील रवींद्र राजाराम पवार,सदस्य गाडी लोहार युवा मंच यांनी सामाजिक बांधिलकी नात्याने एक हात मदतीचा म्हणून या कुटुंबांना जवळपास दीड महिना पुरेल इतक्या अत्यावश्यक वस्तूसह किराणा सह वीस हजार रुपये मदत दिली.त्यामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या या कुटुंबांना आधार मिळाला असून या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

      मयत सचिन बबन इघे व त्यांचे कुटुंबीय घरच्या गरीब परिस्थितीमुळे मिळेल ते काम करायचे मोठ्या हिमतीने तो जीवनाचा संघर्ष करत कुटुंबाची उपजीविका चालवत होता परंतु त्याच्यावर काळाने मोठा घाला घातला त्याच्या पाठीमागे वृद्ध आई-वडील,पत्नी,दोन लहान मुली व तीन महिन्याचा मुलगा असा परिवार असुन या परिवारासाठी खडकवाडी गावातील इतर समाजबांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. त्याचबरोबर लोहार समाजातील बांधवांनी दशक्रियेच्या दिवशी ४८ हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे.त्याचबरोबर दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहिल्यानगर शहरांमध्ये राज्यस्तरीय वधु वर लोहार मेळावा होत आहे या मेळाव्यात अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष संदीप दादा थोरात यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा चेक या पीडित कुटुंबाला देण्यात येणार आहे अशी माहिती श्री बाळासाहेब इघे, सहसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे. 


स्वतःसाठी सर्वच जगतात,पण स्वतःसाठी व इतरांसाठी जगणे यात वेगळाच आनंद आहे व आत्मिक समाधान आहे.सामाजसेवेच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनात थोडासा आनंद निर्माण करण्याचा आमचा कुटुंबाचा प्रयत्न आहे.इघे कुटुंबासाठी मदतीचे समाजातून आवाहन केले असता एक मदत म्हणून कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे.तसेच या कार्यास माझ्या समाजबांधवांचे सुद्धा मोठे योगदान आहे.असा मदतकार्याचा उपक्रम भविष्यात अविरतपणे सुरू ठेवणार आहे," 

 रवींद्र राजाराम पवार- सदस्य गाडी लोहार युवा मंच, कोल्हापूर.
close