shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये ‘स्वामी विवेकानंद चौक’—नामकरण व सुशोभीकरणाची नागरिकांची मागणी.

एरंडोलमध्ये ‘स्वामी विवेकानंद चौक’—नामकरण व सुशोभीकरणाची नागरिकांची मागणी.

एरंडोल शहरातील जुना धरणगाव रोडवरील बचपन स्कूलजवळील चौपुलीला ‘स्वामी विवेकानंद चौक’ असे नामकरण करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी एरंडोलमधील नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील प्रस्तावित राज्य महामार्गावरील चौपुलीस स्वामी विवेकानंद यांचे नाव देऊन प्रेरणादायी स्वरूप देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार, शिक्षण व राष्ट्रप्रेम युवकांसाठी मार्गदर्शक असून, आगामी १२ जानेवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनापूर्वी हे नामकरण व सुशोभीकरण पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीला शहरातील नागरिकांचा व्यापक पाठिंबा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एरंडोलमध्ये ‘स्वामी विवेकानंद चौक’—नामकरण व सुशोभीकरणाची नागरिकांची मागणी.

close