एरंडोल शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, विखरण रोड येथे आज सकाळी १० वाजता युनायटेड वे मुंबई NGO व सन शुअर सोलर कंपनी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ सुमारे ३०० लहान मुले, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. यापूर्वीही ७ व १३ डिसेंबर २०२५ रोजी अशाच शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यात आला होता.
शिबिरास युनायटेड वे मुंबईचे प्रतिनिधी आदिल सर, सन शुअर सोलरचे अधिकारी आर्यन सर, नरेशसिंह सर तसेच मुखप्पाता सोलर प्रोजेक्टचे अधिकारी उपस्थित होते. आयोजन राजेश काठोके (भुसावळ) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. मार्गदर्शन डॉ. प्रेमराज पळशीकर, डॉ. तनुजा पळशीकर, डॉ. योगीराज पळशीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेहल आंबेकर, माजी तहसीलदार अरुण माळी, स्वप्नील पालवे, राजुभाऊ चौधरी (शिवसेना उबाठा), प्रवीण महाजन, प्रा. वासुदेव आंधळे, रवींद्र लांडगे, चंद्रकांत पाटील, संतोष वंजारी, सुनील महाजन, देविदास चौधरी तसेच दक्षिण हनुमान मंदिर मित्र मंडळ व ट्रस्टचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.


