जिल्हयात पो.स्टे. कळंब व पुसद ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ (गांजा) संवधाने केलेल्या दोन वेगवेगळया छापा कारवाईत एकुण ०५ आरोपी ताब्यात घेवुन त्यांचेकडुन १० किलो पेक्षा जास्त गांजा व इतर साहित्य असा एकुण ७,७१,६००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस ठाणे पुसद ग्रा. यांची कारवाई
अहिल्यानगर:-
दिनांक १४/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येचे हजर असतांना पथकास गोपनीय खबर मिळाली की, सैयद राहत अली उर्फ टकल्या सैयद अमजत अली रा. यवतमाळ हा त्याचे साथीदारासह रात्री सुमारास चारचाकी वाहनातून नागपुर वरुन कळंब मार्गे यवतमाळ येथे गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने घेवून येणार आहे. अशा माहिती वरुन पथकाने माहिती बाबत वरिष्ठांना कल्पना देवून छापा कारवाई कायदेशीर पुर्तता करुन नागपुर कळंब यवतमाळ रस्त्यावरील नरसापुर बसस्टॉफ चे समोर सापळा लावुन थांबले असतांना २३/०० वा. सुमारास माहिती प्रमाणे निळ्या रंगाचे स्विष्ट कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. बी. एफ ८०२९ हे येतांना दिसल्याने सदर वाहनास पो. स्टाफ चे मदतीने घांबवून वाहनातील इसमांना गांव पत्ता विचारला असता १) श्रावन हरिदास फुलमाळी यप २७ (चालक) २) प्रितमसिंग दामोधर रामटेके वय ४० दोन्ही रा. अशोक नगर यवतमाळ, ३) सैयद राहत अली उर्फ टकल्या संपद अमजत अली वय ५४ रा. सुराना ले आउट यवतमाळ असे सांगीतले. त्यानंतर पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये इसम सैयद राहत अली पाचे मांडीवर असलेल्या लालरंगाचे बंग मध्ये ८.०३० किग्रॅम कि.अ. १,६०,६०० रु चा गांजा मिळून आल्याने सदरचा गांजा तसचे आरोपीतांचे ताब्यातील तिन मोबाईल, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकुण ६,९१,६०० रु चा मुद्देमाल जप्त करन आरोपोतांविरुध्द पो. ठाणे कळंब येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नौद करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पो. स्टे. कळंच यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
तसेच दिनांक १४/१२/२०२५ रोजी पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथील पोलीस अधिकारी यांना दंगल नियंत्रन पथकातील अंमलदार यांचेकडुन गोपणीय खबर मिळाली की, रात्री सुमारास दोन इसम मोटर सायकलने पुसद कडून दिग्रसकडे गांजा अंमली पदार्थ अवैधरित्या वाहतुक करुन घेवून जाणार आहेत अशा माहिती बहन कायदेशीर बाबीची पुर्तता करुन पुसद ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकारी अंमलदार यांनी सायंकाळी १९/३० वा सुमारास दिग्रस पुसद मार्गावरील ग्राम धुंदी परिसरात सापळा रचला असता माहिती प्रमाणे दुचाकी वाहन येतांना दिसल्याने त्यास थांबवून त्यांची नावे विचारली असता १) शेख इसराईल उर्फ शेख बसीम शेख ईस्माईल चय ३२ रा. संभानी नगर दिग्रस, २) एजाज निजाम नौरंगाबादे वय ३२ रा. गवळीपुरा दिग्रस अशी सांगीतल्याने पंचासमक्षङ्ग उडती घेतली असता त्यांचे मोटर सायकलवरील नायलोन पिशवीत २.०४१ किग्रॅम गांजा कि.अ. ५०,००० रु चा मिळुन आल्याने सदर गांजा व वाहन असा एकुण ८०,०००/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीतांविरुध्द पो. ठाणे पुसद ग्रामीण येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशा प्रकारे जिल्हयात एकाच दिवशी गांजा अंमली पदार्थाच्या दोन वेगवेगळया कारवाई मध्ये एकुण ०५ आरोपोतांकडुन १० किलो पेक्षा जास्त गांजा नावाचा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण ७,७१,६००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करन कारवाई नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. हनुमंत गायकवाड उप.वि.पो.अ. उमरखेड, पुसद प्रभार यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्था..शा. यवतमाळ, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमल्नु, पोलीस अंमलदार सै. सानोद, योगेश गटलेवार, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, रितुराज मेढये, सुनिल पैठणे, आकाश सहारे, देवेंद्र होले, आकाश सुर्यवंशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथील ठाणेदार स.पो.नि. श्री. सुरेंद्र राऊत, पोउपनि राहुल देशमुख, श्रेणी पोउपनि कैलास ससाणे, पोलीस अंमलदार रविंद्र गावंडे, तसेच आरसिपी पथकातील पोलीस अंमलदार अभिजीत सांगळे, संतोष सरकुंडे, अविनाश कदम, सुनिल चिरमाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
(शुभांगो गुल्हाणे) जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक, कार्यालय, यवतमाळ

