बिहार, छापरा जिल्हयातील कुख्यात गैंगस्टर प्रेम यादव याचा 18 नोव्हेंबरला धनबाद, झारखंड येथे तीन मारेक-यांनी दुचाकीवरून येऊन फायरिंग करून खून केला होता, याबाबत झरिया पोलीस ठाण्यात (झारखंड) येथे 318/2025 बीएनएस कलम 103 (1), 61 (1), आर्म अॅक्ट 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी परागंदा होते, सदर गुन्हयाची व्याप्ती व गांर्भीय लक्षात घेता SIT स्थापन करण्यात आली होती. दि. 13 डिसेंबरला सदर आरोपी कोल्हापूर जिल्हयात वास्तव्यास असल्याची झारखंड पोलीसांकडून माहिती मिळाली, त्याअनुषंघाने मा. पोलीस अधिक्षकसो, कोल्हापूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे सुचना करण्यात आले होते.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक, श्री. सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, विनोद कांबळे, रूपेश माने यांचे पथक तयार करून आरोपींची शोध मोहिम राबविण्यात आली. शोध मोहिमेत तामगांव, शिरोली, शिये येथे छापेमारी केली तेव्हा शिये, रामनगर येथून गुन्हयातील मुख्य आरोपी रोहित सिंग व कुणाल तारकेश्वर मांझी यांना ताब्यात घेवून झारखंड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर दोन्ही आरोपींवर खुन, जबरी चोरी, सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.प्राथमिक माहितीनुसार सदरचा गुन्हा बिहारचा कुख्यात गैंगस्टर राहूल पांडे व प्रेम यादव यांच्या टोळीयुध्दातून झाल्याचे निष्पन्न होत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता साो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, विनोद कांबळे, रूपेश माने, अरविंद पाटील यांनी केली आहे.

