मोर्शी शहरांमध्ये उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 /12/ 2025 ते 17/ 12/ 2025 दरम्यान सिकलसेल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीराम नर्सिंग कॉलेज, पावडे नर्सिंग कॉलेज ,तसेच शहरातील विविध शाळांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली
सिकलसेल आजार हा अनुवंशिक आजार आहे सिकलसेल हा लाल रक्त पेशी संबंधित आजार आहे सिकलसेल रक्तपेशी ह्या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात त्यामुळे त्या रक्तवाहिनीतून सहज वाहून जाऊ शकत नाही त्या रक्तपेशी लाल रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिटकून बसतात, त्यामुळे शरीरातील इतर अवयव पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो असे डॉक्टर प्रमोद पोतदार यांनी मार्गदर्शन केले
तसेच सिकलसेल रोगांना रक्ताची कमतरता होणे ,खूप वेदना होणे, डोळे व शरीर पिवळसर पडणे, मेहनतीचे क काम केल्यास किंवा चालल्यास श्वास भरून येणे लहान मुलांना वारंवार जंतुसंसर्ग होने यासारखे लक्षणे दिसून येतात लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी अवश्य करावी, योग्य उपचार व योग्य आहार घेतल्यास आजाराची तीव्रता कमी होऊन ते चांगले आयुष्य जगू शकतात
श्री आशिष पाटील वैज्ञानिक अधिकारी यांनी रक्ताची सिकलसेल तपासणी करून घेण्यासाठी आवाहन केले आहे
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कोरडे सर ,डॉक्टर दिलीप टिंगणे सर, श्री आशिष पाटील, श्रीकांत गोहाड, श्री विनय शेलुरे, श्री अमोल झाडे, प्रशांत बेहरे,प्रकाश मंगळे, नंदू भाऊ थोरात, निलेश शेंद्रे, राहुल बोरकुटे , गौरव हरले,शेख इसुफ , प्रवीण पावडे, आशिष नेरकर,स्वाती बुरंगे ,वृषाली भगत, सुवर्णा श्रीराव , कांचन राऊत, कविता इंगोले,तेजस्विनी डाफे, ऋतुजा वैद्य, नीलिमा भोकरे, तसेच कार्यक्रमाला रुग्ण व अधिकारी बहुसंख्येने हजर होते.

