shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🛑 रस्त्यावरची चव… आरोग्यावरचा घाव! पाणीपुरी, गोळा, लिंबू सरबत मागे दडलेलं भयावह वास्तव

ठाणे | प्रतिनिधी

रस्त्यावरची पाणीपुरी, लिंबू सरबत, बर्फाचा गोळा…
क्षणात जिभेवर विरघळणारी ही चव प्रत्यक्षात मात्र हळूहळू शरीर पोखरणारी ठरू शकते, हे वास्तव एका प्रत्यक्ष अनुभवातून समोर आलं आहे.

ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी आयुक्त असताना तलावपाळीवरील अतिक्रमणे, स्टेशन परिसरातील फेरीवाले, अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम राबवली होती. त्या काळात ‘आज दिनांक’ वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या छायाचित्र पत्रकार सौ. सुखदा प्रधान सिंग यांना या निर्णयांबाबत प्रश्न पडले.


एकदा आयुक्तांच्या दालनात चर्चा सुरू असताना, तलाव परिसरातील पाणीपुरीवाल्यांना हटवल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, श्रीकांत नेर्लेकर उपस्थित होते.
तेव्हा आयुक्त चंद्रशेखर यांनी हसत एक अट घातली—

“उद्या सकाळी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या त्वचारोग ओपीडीमध्ये जा. तिथे जे दिसेल, त्यावर एक स्टोरी कर. संध्याकाळी मी स्वतः पाणीपुरीची पार्टी देतो.”

🏥 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उघड झालेलं भयाण सत्य

दुसऱ्या दिवशी सौ. सुखदा प्रधान सिंग आणि वार्ताहर अरुण मुरकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्वचारोग ओपीडीमध्ये तीन तास घालवले.

त्या अनुभवाने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

👉 ओपीडीमधील सुमारे ९९ टक्के रुग्ण हे पाणीपुरीवाले होते.
👉 चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे हातांची त्वचा जळलेली, सोललेली, जखमी होती.
👉 काहींच्या हातांवर किडे पडलेले, पू साचलेला, जखमा उघड्या अवस्थेत होत्या.

तरीही “पापी पोटाचा सवाल आहे” असं म्हणत तेच हात वापरून पुन्हा पाणीपुरी बनवली जात होती.

⚠️ संसर्ग थेट आपल्या तोंडात!

डॉक्टरांच्या मते,
👉 अशा जखमी हातांमधील संसर्ग थेट पाणीपुरीच्या पाण्यात जातो
👉 टायफॉईड, कावीळ, त्वचारोग, जंतुसंसर्ग यांचा धोका वाढतो

हीच परिस्थिती रस्त्यावरील

  • लिंबू सरबत विक्रेते
  • बर्फाचे गोळे
  • शीतपेय विक्रेते
    यांचीही असल्याचं समोर आलं.

👉 गोडवा वाढवण्यासाठी स्वस्त केमिकल स्वीटनर
👉 काही ठिकाणी तर रुग्णालयातून एक्सपायर झालेले सलाईन वापरल्याचे प्रकार उघड झाले.

❄️ बर्फाचा थरारक प्रवास

सरकारी डॉक्टर असलेल्या सौ. सुखदा प्रधान सिंग यांच्या नणंदीकडून ऐकलेला आणखी धक्कादायक अनुभव—

पूर्वी उत्तर प्रदेशातील सरकारी हॉस्पिटलमध्ये शवागृहात (mortuary) योग्य AC नसल्याने प्रेते ठेवण्यासाठी बर्फाच्या लाद्या वापरल्या जात.
रात्री काही लोक त्या वापरलेल्या लाद्या घेऊन जात आणि बाजारात विकत.
तोच बर्फ पुढे गोळा, लिंबू सरबत विक्रेते वापरत असत.

📌 कायदे कडक झाले… पण धोका संपला का?

आज नियम कडक झाले असले, तपासण्या वाढल्या असल्या तरी
👉 हे प्रकार पूर्णपणे बंद झालेत का?
👉 आपण खातोय ते सुरक्षित आहे का?

याचं उत्तर आजही “नाही” असंच आहे.


🩺 नागरिकांसाठी महत्त्वाचं मार्गदर्शन

✔️ रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाताना दहावेळा विचार करा
✔️ उघड्या हातांनी, जखमी अवस्थेत काम करणाऱ्या विक्रेत्यांकडून अन्न घेऊ नका
✔️ स्वच्छ हातमोजे, शुद्ध पाणी, परवाना दिसतोय का तपासा
✔️ लहान मुलांना, वृद्धांना असे पदार्थ देणे टाळा
✔️ चव क्षणाची… पण आजार आयुष्यभराचा असू शकतो

✍️ लेखिका : श्रीमती सुखदा प्रधान सिंग

माजी छायाचित्र पत्रकार

🛑 ही पोस्ट फक्त घाबरवण्यासाठी नाही, तर वाचवण्यासाठी आहे.
आज नाही खाल्लं तरी चालेल…
पण आरोग्य कायमचं धोक्यात घालू नका.


close