देवळाली प्रवरा | प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ०७ ब मधून नगरसेवक पदासाठी सौ. पल्लवी वैभव ढूस यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले.
सुनबाई निवडून आल्याचा आनंद निश्चितच असला, तरी महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांच्यासह अनेक नगरसेवक पदाच्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने कोणताही जल्लोष न करता, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आभार व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी दिली. या निर्णयाची नोंद प्रभागातील उत्साही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभाग क्रमांक ०७ मधील सुजाण व जागरूक मतदारांनी संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा योग्य वापर करून लोकशाही बळकट केली. तसेच देवळाली प्रवरा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी परिवर्तनाच्या लढ्यात आम्हाला भक्कम साथ दिल्याबद्दल शहरातील सर्व मतदार बांधव-भगिनींचे ढूस परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
याशिवाय, प्रभाग क्रमांक ०७ मधील मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यरत असलेले सर्व शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव तसेच निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणारे सर्व कार्यकर्ते यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
तसेच देवळाली प्रवरा शहरातील व शहराबाहेरील ज्या दृश्य व अदृश्य शक्तींनी या विजयासाठी सहकार्य केले, त्या सर्वांचेही ढूस परिवाराच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.
— आप्पासाहेब भिमराज ढूस, देवळाली प्रवरा

