shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कलेचा किरण पुण्यात उजळला…! अंजली निंबाळकर हिला उत्कृष्ट बालकलाकार Special mention पुरस्कार प्रदान..!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह 
पुणे:- महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आयोजित ८वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – पुणे 2025
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

🎥 देश-विदेशातील दर्जेदार लघुपट, लघुचित्रपट तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे हा महोत्सव कलाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरला. नवोदित कलाकारांपासून ते अनुभवी चित्रपटकर्त्यांपर्यंत सर्वांच्या सर्जनशीलतेचा सन्मान येथे करण्यात आला.

✨ ‘किरण’ लघुपटाला मानाचा गौरव ✨
या महोत्सवात Rashid U. Nimbalkar लिखित व दिग्दर्शित लघुपट ‘किरण (KIRAN)’ याची अधिकृत निवड झाली. विशेष बाब म्हणजे या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या बालकलाकार अंजली निंबाळकर हिने आपल्या सहज, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने परीक्षकांची मने जिंकली.
🏆 अंजली निंबाळकर यांना “उत्कृष्ट बालकलाकार (Special Mention)” या विशेष सन्मानाने गौरवण्यात आले. तिच्या अभिनयातील प्रगल्भता, भावनिक अभिव्यक्ती आणि पडद्यावरील प्रामाणिक सादरीकरणामुळे तिला हा मान मिळाला.

🌈 या पुरस्कारामुळे अंजलीचा अभिनय केवळ प्रेक्षकांपर्यंतच नव्हे, तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर उजळून निघाला आहे. समीक्षक, कलावंत आणि उपस्थित रसिकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
❤️ टीम ‘किरण’ला सलाम!
‘किरण’च्या या यशामुळे मराठी लघुपट विश्वातील नव्या पिढीला प्रेरणा मिळाली असून, अशा प्रतिभावंत कलाकारांना संधी देणारा महाराष्ट्र शासनाचा हा महोत्सव सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा ठरत आहे.
📣 ‘किरण (KIRAN)’ टीम आणि बालकलाकार अंजली निंबाळकर यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
🎬✨ मराठी चित्रसृष्टीचा हा किरण अधिक उजळत राहो…!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्हच्या वतीने किरण टिमचे हार्दिक अभिनंदन..!
०००
close