“आजची धाव उद्याच्या आरोग्यासाठी आहे; एरंडोलची तरुणाई हीच आपली खरी संपत्ती,” — डॉ. नरेंद्र ठाकूर, नगराध्यक्ष.
एरंडोल | प्रतिनिधी —
“शहर निरोगी तर राष्ट्र सक्षम” या विचाराला मूर्त रूप देत एरंडोलमध्ये रविवारी पहाटे आरोग्याचा उत्सव साजरा झाला. येथील रा.ति. काबरे विद्यालयापासून सुरू झालेल्या एरंडोल रन मॅरेथॉन २०२६ मध्ये तब्बल २ हजार युवक-युवती, महिला, मुले-मुली व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘एक तास आरोग्यासाठी’ या संकल्पनेखालील या उपक्रमाने थंडीच्या सकाळीही शहरातील रस्ते धावणाऱ्या पावलांनी गजबजले. १० कि.मी. गटात निपाण्याचा प्रशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला; तेजस ठाकूर व मोहित महाजन अनुक्रमे दुसरा-तिसरा ठरले.
इतर गटांमध्ये.
५ कि.मी. पुरुष: अमर महाजन, विठ्ठल मराठे, निलेश बाहेती
प्रथम क्रमांक डॉ. जमुना बोहरी, द्वितीय उर्मिला पाटील तर तृतीय क्रमांक नगरसेविका छाया दाभाडे.
३ कि.मी. पुरुष: सनी कोळी, ओम पाटील, प्रथमेश जगताप
५ कि.मी. महिला: पायल पवार, लक्ष्मी महाजन, पूजा पाटील
३ कि.मी. महिला (१०–१६): जान्हवी रोझोदे, मेघना पाटील, हर्षदा पवार यांनी बाजी मारली.
नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, प्रायोजक प्रसाद काबरा व ॲड. ओम त्रिवेदी यांच्या हस्ते विजेत्यांना ₹५,१००, ₹३,१०० व ₹२,१०० चे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ठाकूर, शिवसेना गटनेता प्रा. मनोज पाटील, आनंदा दाभाडे, एड.ओम त्रिवेदी, प्रसाद काबरे, यांची उपस्थिती लाभली. डॉक्टरांच्या टीमचेही सहकार्य लाभले तसेच मैत्री सेवा फाउंडेशनचे सागर महाजन, पियुष चौधरी, पंकज पाटील आदी स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.





