श्रीरामपूर | प्रतिनिधी
आज श्रीरामपूर शहरातील एक वेगळे, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे आणि समाजासाठी अखंड झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले चंद्रशेखर (चंदू) भैय्या आगे पाटील यांचा वाढदिवस साजरा होत आहे. लहानपणापासूनच अत्यंत मेहनती, जिद्दी आणि अभ्यासू असलेल्या चंदू भैय्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात अग्रेसर राहून आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
लहानपणापासून आजी-आजोबा तसेच आई-वडिलांचे ते लाडके असून, घरातील संस्कारांचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ठळकपणे दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवरायांनी जसे अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य उभे केले, त्याच विचारधारेतून चंदू भैय्या आगे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय आणि समानतेसाठी काम करीत आहेत.
गोरगरिब, पीडित, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढा सातत्याने सुरू असून, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सुसंस्कृत, सुस्वभावी, मितभाषी, हसतमुख आणि हळव्या मनाचे चंदू भैय्या सदैव दुसऱ्याच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळेच श्रीरामपूर शहरात त्यांचे एक वेगळे, हटके वलय निर्माण झाले आहे.
वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून, आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबविले आहेत. समाजहितासाठी झटणारा तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.
अशा या महान, कर्तव्यदक्ष आणि समाजासाठी समर्पित असलेल्या चंद्रशेखर (चंदू) भैय्या आगे पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळो आणि ते सदैव न्यायाच्या मार्गावरून समाजासाठी कार्यरत राहोत, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.

