मुंबई :–
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारीता व महिला सबलीकरण क्षेत्रातील बहुआयामी योगदानासाठी ओळखले जाणारे डॉ. दत्ता विघावे यांचा भारतातील ‘Extraordinary People of India’ (एक्स्ट्राऑर्डीनरी पीपल ऑफ इंडिया) या नामवंत १०० व्यक्तींच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान त्यांच्या वरील सर्व क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी झाला आहे. यापूर्वी वीरों की शौर्यगाथा पुस्तकातही त्यांचा समावेश झाला आहे.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, रजनीकांत, उद्योगपती रतन टाटा, सचिन तेंडुलकर, नीरज चोप्रा, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, आमिर खान, सलमान खान, हरमनप्रित कौर, सुंदर पिचाई, आनंद महिंद्रा, विराट कोहली, सुधा मूर्ती, कॅप्टन नरेंद्रकुमार सिध्दू यांसारख्या देशविख्यात आणि प्रेरणादायी व्यक्तींचाही समावेश आहे. डॉ. विघावे यांचा या प्रतिष्ठित यादीत समावेश ही त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल आहे, तसेच त्यांच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे प्रमाण दर्शवतो.
डॉ. विघावे यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण समाजापर्यंत शैक्षणिक मार्गदर्शन, देहदान जनजागृती मोहिमा, आणि क्रिकेट विश्लेषण पोहोचवले आहे. त्यांच्या आयपीएल, वनडे, टी२० व कसोटी क्रिकेटवरील सखोल विश्लेषण व आकडेवारीसह मत मांडण्याची शैली क्रिकेट रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याशिवाय, समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य आणि सामाजिक आंदोलन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
रशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्या सॅटेलाईट मॅगझीनमध्येही अतिउच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी जगभरातल्या नामवंत हस्तींमध्ये समावेश झाला आहे.
पाच विश्वविक्रमांचे धनी असलेल्या डॉ. विघावे यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (२०२१–२२) व दादासाहेब फाळके काफ अॅवॉर्ड (२०२५) यांसारखे राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान मिळविले असून क्रिकेट या विषयावर डॉक्टरेट व डि.लीट पदव्या मिळविल्या आहेत. आता या राष्ट्रीय दर्जाच्या यादीत समावेशामुळे त्यांच्या सर्वांगीन कार्याचा गौरव राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावला आहे.
डॉ. विघावे या सन्मानाबाबत अभिमान व्यक्त करत म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी वैयक्तिक नाही; हे माझ्या सर्व हितचिंतकांचे, मार्गदर्शकांचे आणि समाजातील जनतेच्या आधाराचे प्रतिक आहे. देशातील लोकांना योग्य माहिती, शिक्षण व मार्गदर्शन पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे.”
हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची, सामाजिक बांधिलकीची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांची दखल आहे, तसेच त्यांच्या कार्याची देशभर मान्यता असल्याचे दर्शवतो.

