*राष्ट्र घडणीचे संस्कार देणाऱ्या जिजामाता व स्वामी* *विवेकानंद जयंती बनसुडे विद्यालयात उत्साहात साजरी
इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयात १२ जानेवारी रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे सादर केली. यामध्ये प्रिया कोल्हे, भैरवी लावंड आणि अलीना सय्यद या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे होते. त्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक करण्यात आले यात एकूण 37 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 100% निकाल लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक सुजाता ढवळे, जयश्री लावंड यांचा अध्यक्षांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, विभागप्रमुख ज्योती मारकड, सीमा बाराते, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख अर्चना बोंद्रे, शीतल झणझणे, तनुजा फुगे व सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

