shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

एरंडोलमध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

दादासाहेब पाटील महाविद्या लयात व्याख्यान;संविधान अभ्यास व मतदान हक्कावर भर.


एरंडोल | प्रतिनिधी —

यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल (जि. जळगाव) येथे शुक्रवार, दि. 16 जानेवारी 2026 रोजी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.


राज्यशास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात संविधानाच्या मूल्यांवर मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. लीलाधर पाटील (इंग्रजी विभाग प्रमुख, धनदाई महाविद्यालय, अमळनेर) यांनी भारतीय संविधान : स्वातंत्र्यापासून समतेपर्यंतचा प्रवास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम राज्यघटनांपैकी एक असून प्रत्येक नागरिकाने त्याचा अभ्यास व आदर करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात अमितदादा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावणे ही लोकशाहीतील नागरिकांची मूलभूत जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. डॉ. स्वाती शेलार, प्रा. किशोर वाघ, प्रा. ए. टी. चिमकर यांच्यासह प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रास्ताविक प्रा. डॉ. मीना काळे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. पूजा गायकवाड हिने केले तर आभार डॉ. शर्मिला गाडगे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील तिन्ही विभागांतील २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

close