shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा विद्यालयातील सहाय्यक शिक्षक शब्बीर मुलानी यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.

बावडा विद्यालयातील  सहाय्यक शिक्षक शब्बीर मुलानी यांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
इंदापूर: श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथील सहाय्यक शिक्षक शब्बीर ताजुद्दीन मुलाणी यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य पातळीवरील सन 2026 चा राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान  करण्यात आला.
 सदर पुरस्कार सोहळा सातारा जिल्ह्यातील शिरवळ या ठिकाणी झाला.असून शब्बीर ताजुद्दीन मुलाणी यांना मानपत्र, प्रमाणपत्र ट्रॉफी, शाल फेटा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार,  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दादासाहेब कोळी,  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  डॉ. संतोष भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष  मुरलीधर पवार, सातारा जिल्हा महिला संघटक सुनिता केदार यांच्या हस्ते देण्यात आला.
 शब्बीर  मुलाणी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ संचालक  उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील, प्राचार्य घोगरे डी आर, उपप्राचार्य डी व्ही हासे, पर्यवेक्षक शरद व्यवहारे, लोकरे अर बी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अभिनंदन केले.
---------------
फोटो ओळ :  शब्बीर ताजुद्दीन मुलाणी यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन  यांच्या वतीने राज्यस्तरीय
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
close