पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर येथील नवनिर्वाचित नगरसेवक मा. महादेव धोत्रे साहेब (बाॅस) यांच्या पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आज सन्मान आणि उत्साहाने भारलेला सत्कार सोहळा संपन्न झाला. जनतेच्या विश्वासातून निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधीच्या सत्कारासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मा. शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत साहेब, साहित्यिक संभाजीनगरचे टि. एस. चव्हाण सर, ज्येष्ठ पत्रकार रमेश जेठे सर, तसेच राजकुमार व्यवहारे, लक्ष्मी प्रसाद मोहिते, सतीश चंद्रराव, वागणे सर, प्रमोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत मा. महादेव धोत्रे साहेब यांचा राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथ, शाल व हार देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेवक महादेव धोत्रे साहेब म्हणाले,
“जनतेने दिलेला हा विश्वास मी कधीही ढळू देणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, विकास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही धोत्रे साहेबांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा नवा अध्याय ठरेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सत्कार सोहळ्यामुळे जनसंपर्क कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
— शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह

