कोल्हापूरहून गावाकडे जाताना तिन्ही जिल्हयाची हद्द संपली अहिल्यानगर जिल्हयाच्या सरहद्दीवरील ऐतिहासिक खर्डा नगरीत प्रवेश करताना दूरवरूनच भुईकोट किल्ल्या जवळच डोलाने फडकणारा भगवा दिसला मन भरून आल . उंच डोंगरावरचा कानीफनाथ गावाचा राखणदार शेजारच्या झाडावर फडणारा भगवा गावाभोवती छोट्या मोठ्या पर्वतरांगा मध्ये, कौतुकेच्या तिरावरती वसलेले माझ ऐतिहासिक खर्डा
इथेच गाव कुसाच्या बाहेर वडर गल्लीत माझा जन्म झाला जन्मानंतर गल्लीतील अंगात देव येणाऱ्या बुर्जुग आज्यानी चुलत्याला पूर्वी देवीला पोतराज सोडला होता त्यांनी परस्पर घरच्यांना न विचारता जटा काढून टाकल्यामूळे देवीचा कोप झाला अस घरच्या सर्वाच मत तयार झाल होत त्यामूळे मला लक्ष्मी आईचा पोतराज सोडला . बालवयात विहीरीत नदीत पोहणे, मित्रासमवेत भटकंती करणे त्यामुळे डोक्यावरीस केसाकडे दूर लक्ष केसात ऊवा ' लिखाचे साम्राज्य
आई-आजी , शेजारच्या सुशिला वहिणी, गंगू वहिनी, सुमन वहिनी मला धरुन अंगणात बसवायच्या .केस विचरणे, केसातील उवा, लिखा काढणे केस बांधणे, वेणी घालणे, बुचडा बांधणे सहज मायेने करत. मी माझ्या आईला केसाला धरु देत नव्हतो . तिच्यावर खूप रागवायचो माझ्या वहिणीनी माझ्या केसाची निगा ठेवली होती.
शाळेत जायला लागलो त्यावेळी माझ्या वर्गात गावातील शुकवारपेठे पासून ते हरिजन वाड्यापर्यत सर्वच .गावातील मराठ्याची मुल, व्यापाऱ्याची, उच्चप्रभू मुलांसह बाराबलुतेदाराची मुल होती लहान असल्यामूळे मुल केसा बद्दल काय काय म्हणायची मला त्यांची काय समज नसल्यामूळे काही समज नव्हत पुढे चौथीला गेलो स्कॉलरशिप परीक्षेला जामखेडला गेलो आजीने बांधलेला केसाचा बुचडा सुटला माझी तारांबळ उडाली काय कराव हे सुचेना गुरुजीना सांगीतल गुरुजी म्हणाले शर्टच्या आत सोड .केस दिसत नाहीत खूपच लाज वाटली सर्व मुल माझ्याकडे बघून हसत होती
घरी आलो आजीला सांगीतल .तुझ्या अंगात देवी येती त्या देवीला सांग माझे डोक्यावरील केस काढ मला शाळा शिकायच मला मोठ व्हायच आजी म्हणाली देवीचा कोप होईल. तूझ काय तरी बर वाईट होईल केस काढता येणार नाहीत.
तसाच पूढ शिकत गेलो केसाचा बुचडा बांधणे टोपी घालणे त्यावर रुमाल बांधणे. अंगात वेगवेगळ्या कला होत्या खेळव, पळाव स्पर्धेत भाग घ्याव अस वाटायच पण खेळणाऱ्या मित्राकडे बघत बसायचो केसामुळे कायपण करता येत नव्हत
दहावीच्या वर्गात गेलो आजीला , आई- वडिलांना -काकांना सांगितल या केसामुळे मला पूढच शिक्षण घेता येणार नाही केसाचा विचार करा
माझे काका रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल .सात्रळ शाळेत सेवेत होते त्यांनी घरच्याची दिवसा .समजुत काढली संध्याकाळी सर्वच मंडळी दारु पेऊन ताईट असायची घरच्या सर्वच मंडळीचा देवीवर मोठा विश्वास घरातील माझे काका सोडले तर शिक्षणाचा कुणालाच गंध नव्हता त्यामूळे श्रद्धा अंधश्रद्धा काय असते त्याचा कुणालाच विचार नव्हता फक्त आषाढा .पौर्णिमा. झाल की देवीला बकर कोंबडा कापणे - यथेच्छ खाणे माझा मला विचार करावा लागेल अस मनाने ठरवल आणि एका दिवशी मीच काढल्या माझा जटा मी .जटामुक्त झालो जटा असताना राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या वडार गल्ली तीत शाखेचा .स्वयंमसेवक होतो पूढे मुख्य शिक्षक, कार्यवाह, संघाची शिबीरे, विस्तारक . अशी जबाबदारी सांभाळत परस्थितीशी संघर्ष करत
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत घडल्यामूळे कमवा आणि शिका हे ब्रिद नसा नसात भिनले होते.शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो घेतो तो गुरगुल्या शिवाय राहत नाही हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार उराशी बागळून छत्रपती शिवाजी महाराजाचा चारित्र्याचा विचार शून्यातून विश्व निर्माण करणाची जिद्द बाळगून वाटचाल करत पूढे बी.ए बी .एड झालो त्यानंतर एम ए एम एड पत्रकारितेत बी .जे करून डि .एस .एम केल आता कोल्हापूर जिल्हयातील शाहूवाडी तालुक्यात ' मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे सर्वच कुटूंब स्थिरस्थावर झाल आहे.
मी जटामुक्त झाल्यामूळे मला स्वाभीमानाने माणूस म्हणून जगता आले नाहीतर पोतराज होऊन फिरावे लागले .असते .

