प्रतिकुल परिस्थितीवर मात करून
यशस्वी व्हावे - शकील काकर
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जळगांव येथील इकरा कॅम्पस या ठिकाणी काकर समाजातील उच्च शिक्षित प्रतिभावंतांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय भुमिका बजावल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. काकर समाजातील उच्च शिक्षित प्रतिभावंत व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी भव्य अशा समारंभाचे आयोजन ईकरा शिक्षण संस्था मोहाडी जळगांव याठिकाणी करण्यात आले होते.
कार्यक्रमास डुंगरपूर (राजस्थान) येथून ज्येष्ठ पत्रकार राजूभाई बर्तनवाला, धार (मध्यप्रदेश)येथील शफी नक्षबंदी , इंदौर (मध्य प्रदेश) येथील जाकीर काकर, बुरहानपुर येथील हाजी शफी, मुश्ताक जिलानी, श्रीरामपूर येथील इकबाल इस्माईल काकर सर, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नासीर काकर,सरफराज काकर परळी येथील अ.गफ्फार काकर,अचलपूर येथील जमील मास्टर, धुळ्याचे गुड्डूभाई, जावेद काकर , शफिक काकर,अहमद बब्बु (आकोट) पत्रकार इकबाल हनीफ (आर्वि) ,अ.करीम सौदागर, अमरावती येथील मुख्तार काकर,शायर शकील पहेलवान, लोहारी चे मुख्तार काकर, भोकरी वरखेडी येथील सोफियान काकर , सलीम काकर साथी , अब्दुल अलीम काकर, हाफीज साहब, जळगाव चे अकबर काकर, युनूस बाबुजी,नबु भाई, सत्तार पिरन तौसिफ शरीफ, मुंबईहुन विशेष अतिथी म्हणून शकील सुलेमान काकर (MPSC) शासकीय अधिकारी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठण नंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे स्तुत्य, नाते पाक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष बिलाल हुसेन काकर होते.
ईकरा शिक्षण संस्था चे अध्यक्ष अ.करीम सालार यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
काकर समुदायातील उच्च शिक्षण घेतलेल्या काकर बांधवांचे विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले शकील सुलेमान काकर यांना फखरं - ए - काकर पुरस्कार देवून शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख (श्रीरामपूर) हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्रोही सामाजिक चळवळ व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्यिक संस्थेच्यावतीने श्रीरामपूरच्या इकबाल इस्माईल काकर सर यांना डॉ. सलीम शेख यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शकील सुलेमान काकर यांनी स्पर्धा परीक्षाबाबत मोठ्या मोलाचे मार्गदर्शन केले.
अ.करीम सालार यांनी सत्कार्थींनी इथेच न थांबता आपल्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यास प्रोत्साहित केले. धारचे मौलाना शफी नक्शबंदी, श्रीरामपूरचे इकबाल काकर सर, इंदौर चे पत्रकार जाकिर काकर, नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार इकबाल काकर व परळीचे गफ्फर काकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य
सुत्रसंचालन व सत्कार आयोजन मुश्ताक करीमी आणी फारूक सर यांनी केले, आभार प्रदर्शन इस्माईल सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तौसिफ शरीफ, जय्यान करीमी, रेहान करीमी,ईंतेखाब आलम ,उमर जब्बार व काकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111

