shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश.. अकोला विभागातील सर्वसाधारण बदल्या १००% पारदर्शक व कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार संपन्न


*दिनांक : १५ मे २०२६*

*अमरावती : महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. नं. २९३४ ने गट 'क' संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांमध्ये होणाऱ्या अनियमिततेचा मुद्दा शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली व राज्य स्तरावरून हालचाली गतिमान झाल्या.*

*आरोग्य विभागाच्या अवर सचिव मा. सावदेकर मॅडम यांनी दि. १४/०५/२०२६ रोजी सायं. ५ वाजता परिपत्रक काढून पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.*

*संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री डी. एस. पवार यांनी अकोला विभागाचे मा. उपसंचालक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून यावर्षीच्या सर्वसाधारण बदल्या समुपदेशनाद्वारे, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार व पारदर्शकपणे करण्याची विनंती केली. अकोला विभागाच्या प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन रातोरात सर्व आवश्यक याद्या तयार केल्या.*

*विभागीय स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी, बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी, रिक्त पदांची यादी, अवघड व बिगर अवघड क्षेत्राची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी या सर्व याद्या नोटीस बोर्डवर लावून प्रसिद्ध करण्यात आल्या.*

*आज दि. १५/०५/२०२६ रोजी विभागीय स्तरावर अकोला येथे आरोग्य कर्मचारी व आरोग्य निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन घेण्यात आले. यामध्ये ७९ आरोग्य कर्मचारी व ४ आरोग्य निरीक्षकांचे समुपदेशन झाले. अमरावती जिल्ह्यातील ३९ आरोग्य कर्मचारी व १ आरोग्य निरीक्षकांसह सर्वांच्या बदल्या त्यांच्या इच्छेनुसार, ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी झाल्या आहेत. कोणालाही अडचण आली नाही.*

*त्यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर असून त्यांनी संघटनेचे जाहीर आभार मानले आहेत.*

*आज अकोला विभागातील सर्वसाधारण बदल्या कर्मचाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे झालेल्या आहेत. त्या सर्व बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. नं. २९३४ च्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच योग्य, निःपक्ष व पारदर्शक कार्यवाही केल्याबद्दल प्रशासनाचे जाहीर आभार व धन्यवाद.*

डी. एस. पवार
राज्य अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना
र. नं. २९३४
close