shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

📍*प्रसादनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे.!


📍नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..!

देवळाली प्रवरा - दि.१५ मे 
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ०७ प्रसादनगर येथे  भव्य स्मारक उभारण्याबाबत यावे अशी मागणी नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजयजी शिरसाठ साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार हेमंत ओगले साहेब आदींना देणेत आले आहे. 

      दिलेल्या निवेदनात ढूस यांनी म्हटले आहे की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांनी सामाजिक समता, न्याय व बंधुता या मूल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ०७ प्रसादनगर येथे भव्य स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
      निवेदनात ढूस यांनी पुढे असेही म्हटले आहे की, सध्या आमच्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे असे कोणतेही भव्य असे मध्यवर्ती स्मारक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी, अभ्यासक व नागरिकांना त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नाही. शहर हद्दीत केवळ प्रसादनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गेली कित्येक वर्षांपासून अत्यंत कमी जागेत अर्धाकृती पुतळा असून त्या जागेत भव्य स्मारक उभारणी करणेस जागे अभावी अडचण निर्माण होणार असल्याने आपणास विनंती की,
1.  देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ०७ प्रसादनगर येथील उपलब्ध शासकीय जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मंजूर करण्यात यावे.
2.  स्मारकामध्ये वाचनालय, अभ्यासिका, डिजिटल संग्रहालय व सभागृह यांचा समावेश करावा..
3.  स्मारकाच्या देखभाल - दुरुस्तीसाठी स्वतंत्र समिती नेमावी..
4.  दरवर्षी 14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी शासकीय कार्यक्रमाचे तेथे आयोजन करण्यात यावे..
               सदर स्मारकामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा वाढेल व नवीन पिढीला प्रेरणा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तरी आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर स्मारक लवकरात लवकर उभारणी करणे कामी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती पल्लवी वैभव ढूस यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
000
close