शिर्डी प्रतिनिधी :
दैनिक पुण्यनगरी परिवाराच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठलराव पवार यांना मानाचा ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आयपीएस श्री. कृष्णप्रकाश व ‘बीजमाता’ पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. विठ्ठलराव पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साईबाबांचे सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते हाजी गफार खान पठाण, भाजपा युवा नेते नानासाहेब शिंदे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष अक्षय तळेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता विभागातील सामान्य कर्मचाऱ्यापासून ते श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदापर्यंतचा विठ्ठलराव पवार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. कामगार, शेतकरी व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

