अकोले / प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सहभागी ग्रामपंचायतच्या तपासणी हिंगोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून अकोले तालुक्यातील कळस ग्रामपंचायत ची तपासणी करण्यात आली. या पथकात हिंगोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.डी. घुगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा दैनिक गांवकरीचे जिल्हा प्रतिनिधी गजानन मगर , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी मग्रा रोहयो निलेश राठोर यांचा सहभाग आहे.
यावेळी अकोले पंचायत समीतीचे प्रभारी गटविकास अधिकारी रमेश मुठे,विस्तार अधिकारी विजय धाकतोडे,नंदराम पवार आदी उपस्थित होते.
कळस ग्रामपंचायत चे कार्यालय, कळस जिल्हा प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, स्मशानभूमी आदी ठिकाणी भेटी दिल्या. कळसेश्वर देवस्थान चा परिसर पाहून भारावून गेले. प पु सुभाषपूरी महाराज यांनी या देवस्थान चा विकास कुठलीही शासकीय मदत न घेता लोकवर्गणीतून केलेला पाहून आश्चर्य व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळेतील कॉम्पुटर व विज्ञान लॅब पाहूनही समाधान व्यक्त केले. शाळे चे पटसंख्या बाबद आनंद व्यक्त केला. गावातील ग्रामस्थ पदाधिकारी यांचा एकोपा व सलोखा या बाबद त्यांना आश्चर्य वाटले. गावातील व मंदिर परिसरात असलेली स्वच्छता याचेही कौतुक केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (2025-26) हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, ज्याचा उद्देश ग्रामपंचायती सक्षम करून शाश्वत ग्रामीण विकास साधणे आहे. हे अभियान सुशासन, पाणी व्यवस्थापन, जनसहभाग आणि डिजिटल साक्षरतेवर भर देत असून प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधी पर्यंत राबविल्या गेले आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण मिळणार आहेत.
यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे, माजी सरपंच तथा जयकीसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, पोलीस पाटील देवस्थान चे सचिव गोपीनाथ ढगे, ग्रामपंचायत सदस्य जिजाबा वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, माजी उपसरपंच दिलीप ढगे, माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते,
यावेळी ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे, कामगार तलाठी सुरेखा कानवडे, वैद्यकीय अधिकारी रिद्धी जाधव, मुख्याध्यापक तान्हाजी वाजे, पशुधन अधिकारी रविंद्र घोडके, आशा गतप्रवर्तक भारती गायकवाड आरोग्य सेविका पुष्पा मेंगाळ, आरोग्य सेवक अजित कदम अंगणवाडी सेविका मालती गोसावी, आशा ढगे, मनीषा वाकचौरे, संगीता वैराट, आशा सेविका सुनीता गवांदे, तनुजा हासे, योगिता चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, माधव वाकचौरे, शंकर वाघमारे आदींनी आपली माहिती सादर केली.

