पुणे : पुण्यातील फिटनेसप्रेमी समाधान वाकचौरे यांनी प्रतिष्ठित IRONMAN 140.6 Da Nang स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात १३ तास २७ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली.
मधुमेहाशी झुंज देत आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या सांभाळत, समाधान यांचा आयर्नमॅनपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शिस्त, सातत्य, कठोर प्रशिक्षण, पहाटेची मेहनत, पोहणे, सायकलिंग, धावणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योग्य आहार यांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले.
याबाबत बोलताना समाधान वाकचौरे म्हणाले, “कोणतेही आव्हान आपल्या निर्धारापेक्षा मोठे नसते. शिस्त आणि सातत्य असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते.”
मधुमेहापासून आयर्नमॅनपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेक फिटनेसप्रेमी आणि आरोग्याशी झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
कामगिरी : पूर्ण आयर्नमॅन (३.८ किमी पोहणे | १८० किमी सायकलिंग | ४२.२ किमी धावणे) १३ तास २७ मिनिटांत पूर्ण.

