shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

व्याहाळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
इंदापूर: व्याहाळी, ता. इंदापूर : पुणे मॉडेल स्कूल तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्याहाळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, पदाधिकारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक संतोष हेगडे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व, योगाचे दैनंदिन जीवनातील स्थान आणि निरोगी आरोग्यासाठी योगाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर योग प्रशिक्षक प्रभाकर लावंड यांनी विविध योगासने व प्राणायामांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत योगासने केली.
यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भस्त्रिका तसेच योगनिद्रा आदी योगप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्यही सुदृढ राहते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे माऊली चवरे, शुभम शिंगाडे, राजकुमार जठार, प्रविण शहा , संदीप माने, सत्यजित रणवरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कैलास गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
"करे योग, रहे निरोग" हा संदेश देत व्याहाळी येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला.
close