--स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख यांच्या प्रेरणेने रविराज पाटील गडाख यांनी जपला वारकरी सेवेचा विणलेला धागा ::हभप म्हस्के महाराज
सोनई / शनिशिंगणापूर-मोहन शेगर:- श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना ह भ प देविदास महाराज म्हस्के, यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर रविराज गडाख यांनी प्रेम, विश्वास, व मायेने विणलेला धागा धरून ,धार्मिक अतूट बंध जपल्याचे आदर्श घालून दिल्याचे मत हभप म्हस्के महाराज यांनी मत व्यक्त केले. पायी चाललेल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वारकऱ्यातील वारकऱ्यांना आरोग्याच्या हितासाठी सर्वांच्या सहकार्य यांनी वैद्यकीय साहित्याची, सुविधा भेट स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख यांच्या प्रेरणेतून युवा नेते रविराज पाटील गडाख व हनुमान ग्रामीण शिक्षक मंडळाचे पानसवाडी सचिव अध्यक्ष जयश्री ताई गडाख यांच्या उपस्थितीत मेडिसिन, औषधं, वैदिकीय सुविधा मिळाव्यात अशा वस्तू भेट देण्यात आली. स्वर्गीय. तुकाराम गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी ह भ प देविदास महाराज म्हस्के यांचे रविराज पाटील गडाख व जयश्रीताई गडाख यांनी संत पूजन करून त्यांचा सन्मान केला.यावेळी हभप सोमनाथ महाराज गडाख, हभप सोमनाथ महाराज सोनवणे हभप संजय जाधव,जालिंदर वाकचौरे, जगन्नाथ भगत,शिक्षक प्रशांत गडाख, अशोक केदारी, बाप्पुसाहेब दारकुंडे,विजयराव सदाफळ, संजय चेमटे, शिक्षक अशोक दराडे, माजी मुख्यध्यापक भाऊसाहेब खेस्मालस्कर, विजय खोसे आदी उपस्थित होते.

