*भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीचा उत्सव साजरा:*
*मतदानातून निवडले विद्यार्थी नेते; विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव.*
*इंदापूर (दि.३१)*: येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण, शांततामय व लोकशाही पद्धतीने संपन्न झाली. बुधवारी (दि.२९) विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मूल्यांचा आदर्श घालून दिला. शुक्रवारी (दि.३१) रोजी मतमोजणी घेण्यात आली.
मतमोजणीनंतर पुढील विद्यार्थी विजयी घोषित झाले :
*प्राथमिक विभाग*
*(इ.५ वी ते इ.७ वी)*
१)आराध्य गोपीनाथ थोरात – इ.६ वी
कु. तनिषा धनंजय आरडे – इ.७ वी
*माध्यमिक विभाग*
*(इ.८ वी ते इ.१० वी)*
१)सुमित सागर पाटोळे – इ.१० वी
२)कु. वैष्णवी आश्रुबा सूर्यवंशी – इ.१० वी
*उच्च माध्यमिक विभाग* (इ.११ वी–इ.१२ वी)
१)यश दत्ता कांबळे – इ.१२ वी (विज्ञान)
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडली. मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आदर्श अनुभव घेतला. विजयी उमेदवारांचे संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) , सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
"जागरूक विद्यार्थी... जबाबदार नेतृत्व... उज्ज्वल भविष्य!" या ब्रीदवाक्याला साजेशी ही निवडणूक विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्ये रुजविणारी ठरली.
मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या समता मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली
हिरालाल चंदनशिवे यांनी शालेय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

