shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सदस्य नोंदणी अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव

औसा : भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येकी १,००० सदस्य नोंदणी पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ विशेष स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.


या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण तसेच पालकमंत्री मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद आणि अभिमान कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


लोकप्रिय आमदार मा. श्री. अभिमन्यूजी पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील १,००० सदस्य नोंदणी पूर्ण करणाऱ्या ५६ कार्यकर्त्यांना कांचन हॉटेल येथे आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. औसा विधानसभा मतदारसंघाने सदस्य नोंदणी अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार अभिमन्यूजी पवार यांच्या नेतृत्वाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी गौरव प्राप्त कार्यकर्त्यांनी सांगितले की, आमदार अभिमन्यूजी पवार यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्यामुळेच हा अविस्मरणीय सन्मान मिळाला असून त्याबद्दल त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यापुढेही भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

close