राहुरी - राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा सरचिटणीस पदी जेष्ठ पत्रकार रमेश प्रभाकर बोरुडे यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी निवडीचे पत्र दिले.
राज्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासकीय स्तरावर न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून राज्यात वेगळी ओळख आहे. काम संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातही संघटनेचे काम जोमाने सुरू आहे. संघटना बळकटीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये काम करणार्या पत्रकारांचा संघटनेत सहभागी करून संघटना मजबूत करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्हा दक्षिण विभागाची सरचिटणीस पदाची जबाबदारी राहुरी तालुक्यात गेली चाळीस वर्षांपासून सातत्याने विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात मोलाची कामगिरी करत असलेले जेष्ठ पत्रकार रमेश प्रभाकर बोरुडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तालुक्यातील विविध विषयांवर लिखाण करुन अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडली आहे. जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिकांत राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आदी विविध विषयांवर आपल्या लेखणीने छाप पाडली आहे. तालुक्यातील पत्रकार संघटेनत यापूर्वी विविध पदांवर काम केले असल्याने त्यांच्या अनुभवाचा व संघटन कौशल्याचा फायदा निश्चितच संघटनेला होणार असल्याने प्रतिपादन संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी श्री. बोरूडे यांच्या सत्कारप्रसंगी केले.
रमेश बोरुडे हे साप्ताहिक विचारमंच चे संपादक असून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून दक्षिण भागात त्यांचे चांगला संपर्क आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

