आज दिनांक 8.9.2026 रोजी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली फूड बास्केट वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता तुषार फाउंडेशन अमरावती तसेच क्षयरोग पथक मोर्शी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी क्षय रुग्णांना गहू तांदूळ तूर डाळ मूग डाळ गुड खजूर अशा पौष्टिक अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीकांत गोहाड यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाकरिता श्री रितेश पुंड STS, श्री अमोल झाडेTBHV, डॉ. गिरीश धोटे.श्री रितेश कुकडे, विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे,चेतन मासोतकर तसेच मोर्शी शहरातील क्षय रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

