shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा*प्रतिनिधी मोहन शेगर सोनई

नेवासा - येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अशोक तुवर होते. यावेळी सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी प्राचार्यांनी  "गुरु हा केवळ शिकवणारा नसून घडवणारा असतो, आजचा विद्यार्थी हाच उद्याचा देशाचा आधार आहे" असे मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत मांडले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरिश्चंद्र माने ,पर्यवेक्षक प्रा. गोवर्धन रोडे , यश संवाद  प्रमुख प्रा देविदास साळुंके सर, ज्येष्ठ प्रा. भगवंतविरकर, प्रा राम काळे ,प्रा श्रीमती भोगे मॅडम आदी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा राऊत, कु. श्रद्धा मारकळी हिने केले तर आभार कु. शिवकन्या शेटे हिने मानले.
०००
close