shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणरायाची आरती; माजी राष्ट्रपतींचे स्वागत उमेश काशिकर यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

राजभवन परिसरातील कर्मचारी वसाहतीमध्ये किमान पाच दशकांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक राज्यपालांनी या मंडळाला भेट दिली आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. त्यावेळी गणेशोत्सव सुरु होता. परंतु गणेश स्थापना अगोदरच झाली होती. त्यावर्षी आणि पुढेही कोश्यारी कर्मचारी वसाहतीमध्ये सर्वांसोबत आरती करण्यास आले. पुढे त्यांनी राजभवनातील आपल्या निवासस्थानी गणपती बसवण्याची परंपरा सुरु केली. 

कोश्यारी यांच्यानंतर आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या निवासस्थानी गणेश स्थापना करण्याची प्रथा कायम ठेवली. त्यांचा १८ महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. 

राधाकृष्णन महाराष्ट्रात अवघे तेरा महिने होते. तरी देखील त्यांना २०२४ व २०२५ अशी दोन वर्षे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचे भाग्य लाभले. 

योगायोग म्हणजे गणेश चतुर्दशीपूर्वीच त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीला जावे लागले. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे दिनांक १२ सप्टेंबर रोजी ते भारताचे उपराष्ट्रपती झाले ! 

दरम्यान राजभवन हे लोकभवन झाले.

परंपरेनुसार विद्यमान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी देखील आज सकाळी आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. आरती केल्यानंतर उपस्थित सर्वांना त्यांनी आरती करण्याची संधी दिली. 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देखील आज लोकभवन येथे आगमन झाले. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करण्याची देखील संधी लाभली.
close