shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोककला महोत्सवात साहित्यिक रज्जाक शेख सन्मानित

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-- मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर येथे कै.पुंजाजी बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगर यांच्यावतीने महाकवी वामनदादा कर्डक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित लोककलावंतांचा लोककला महोत्सव व सन्मान सोहळा 2026 उत्साहात पार पडला.


 छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील कवी,साहित्यिक गझलकार,अभिनेते रज्जाक शेख यांनी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेल्या भाषिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल शाल,पुष्पगुच्छ, आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक  देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांचे हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक माननीय कांबळे होते तसेच प्रमुख उपस्थितीत दुग्धविकास व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे , महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानाचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम घोडके, स्वागताध्यक्ष एकनाथराव त्रिभुवन, शाहीर अशोक बागुल,ग्रामीण कवी आनंदा साळवे, भीमशाहीर सुनील खरे, नंदकुमार खरात आदी मंडळी उपस्थित होते.शेख यांनी मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षणसाठी अनेक कवीसंमेलनात जाऊन आपल्या कवितांचे सादरीकरण केले आहे.शेतीमाती आणि ग्रामीण जीवन हा त्यांचा कवितांचा मुख्य विषय. त्याचबरोबर दोन लघुपटात त्यांनी अभिनेते म्हणून अभिनय केलेला आहे.राज्यस्तराव आयोजित विविध उपक्रम आणि भाषिक सांस्कृतिक सन्मानाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.
000
close