अपघात होण्याची भिती ...
प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई --कौतुकी नदीवर पुलाचे काम चालू असताना उकरलेली माती रस्त्यावर टाकून अपघातास निमंत्रण व व्यावसायिक दुकानासमोर खादून ठेवल्याने अडचण निर्माण झाली आहे.तरी ती तात्पुरती पाणी जाण्यासाठी नळ्या टाकून गैरसोय दूर करावी.अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.
या राहुरी - शनिशिंगणापूर रस्त्याचे काम आद्यपही उरकले नसून पुलाचे काम संथ गतीने चालू आहे, त्या मध्ये गावात बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचले होते,त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्वीची साईड गटार बंद झाल्याने त्याचा प्रवाह नदीकडे तात्पुरता काढला गेला,मात्र व्यावसायिकांच्या दुकानासमोरून खांदून माती रस्त्यावर टाकली आहे, त्या मुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांची ये जा करण्यासाठी अडचण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक व नागरिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
आधीच कोरोनाने जगणे मुश्कील होऊन बसले आहे, त्यात कुठं लोकडाऊन नसल्याने दुकानदारांनी दुकाने चालू करून आपला उदरनिर्वाहचा प्रश्न सुटेल पण त्यामध्ये दुकानासमोरच मातीचे ठिगारे ठेकेदाराने टाकल्याने मोठी पंचायत झाली आहे. तरी हे मातीचे ठिगारे नळ्या टाकुन बुजवावेत, जे ने करून व्यावसायिकांची व्यवसाय सुरू राहतील व अपघात होणार नाही.
अशी काळजी प्रशासनाने घेण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान कौतकी वरील पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.