शौकतभाई शेख श्रीरामपूर :- विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवायचे असेल तर पुस्तक वाचनाची सवय असणे फार महत्त्वाचे आहे असे उद्गार तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन परिसंवादात काढले.
त्या पुढे म्हणाल्या की, वाचनामुळे भाषाग्रहण क्षमता वाढते .मेंदू सक्रिय राहतो .संवाद कौशल्यात भर पडते. फोकस वाढवण्यासाठी वाचन फायदेशीर ठरते.पुस्तके नव्या ज्ञानाचे दार उघडतात .देश-विदेशातले ज्ञान मिळते .चालू घडामोडी समजतात.दुस-या सत्रात ग्रंथालय प्रमुख प्रा.सतिश पावसे यांनी संपूर्ण ग्रंथालयाची ओळख करुन दिली.महाविद्यालयात नऊ हजार पुस्तके आहेत .२१ विविध नियतकालिके व मासिके आहेत.दैनंदिन वर्तमानपत्रे येतात..
स्पर्धा परीक्षेची खूप संदर्भपुस्तके आहेत असे सांगितले.तर तिस-या सत्रात विद्यार्थ्यांनी आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन केले.त्यात ईशा चितळे, अक्षदा हिंगे, साक्षी थोरात, वर्षा बर्डे ,कोमल कांदळकर, पूजा सोनवणे , अर्शिया शेख, जया काळे ,सिद्धी नवाळे, सानिया तांबोळी, मनीषा मुसमाडे, विजया फलके यांनी सक्रिय सहभाग घेतला. परिसंवादाची अध्यक्षीय सूचना सुरैया शेख हिने मांडले अध्यक्षीय अनमोदन मयुरी बंगाळ हिने दिले. प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी प्रास्ताविक केले .विजया फलके व मनीषा मुसमाडे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. परिसंवादासाठी सर्व प्राध्यापक उपस्थित होते.