shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि. प. प्रा. शाळा वडापुरी येथे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती,पुस्तक वाचन,हात धुवा दिन साजरा .

जि. प. प्रा. शाळा वडापुरी येथे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती,पुस्तक वाचन,हात धुवा दिन साजरा .

इंदापूर प्रतिनिधी: आज वार शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी या ठिकाणी अगदी सकाळपासूनच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलांणी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्यामसुंदर माने सर यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलामांविषयी माहिती सांगून वाचनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मुलांनी आवडीने पुस्तक वाचन केले. यानंतर हात धुवा दिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे पालक ज्ञानेश्वर तपासे यांच्यामार्फत वर्तमान पत्र वाटप करून वृत्तपत्रदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी मुख्याध्यापिका रजिया शेख मॅडम यांनी आलेल्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रतिभा गर्कळ  मनिषा मोरे, ज्ञानेश्वर तपासे, विठ्ठल कदम यांचे सहकार्य लाभले.
close