खेड;-
शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात ६ सप्टेंबर२०२३ रोजी शासकीय अध्यादेश (जी. आर.) जाहीर केला आहे. त्यानुसार विविध पदावर शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इत्यादींना कंत्राटी पद्धतीने भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यास ६० टक्के रक्कम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या हातात आणि१५% रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदारांना मिळणार त्यामुळे वंचित गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. ही पद्धती व वशिल्याचे व भ्रष्टाचाराचे कुरण ठरणार आहे.
त्यामुळे या धोरणा विरोधात सर्वांनी आवाज उठवण्याची गरज आहे. त्यासाठी खेड तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने चाकण ता. जि. पुणे येथे नुकतेच शासनाच्या "कंत्राटी भरती" धोरणाला विरोध करण्यासाठी शासनाचे कंत्राटी पद्धतीने भरती परिपत्रक फाडून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारत माता की जय!
वंदे मातरम!
कंत्राटी नोकर भरतीचे परिपत्रक मागे घ्या!
रद्द करा !रद्द करा! कंत्राटी नोकर भरतीचे परिपत्रक रद्द करा!
जागे व्हा जागे व्हा !आता तरी जागे व्हा!
इन्कलाब जिंदाबाद!
आम आदमी पक्षाचा विजय असो!
नही चलेगी नही चलेगी! दादागिरी नही चलेगी!
यासारख्या घोषणा देण्यात आल्या.
आप प्रदेश युवाअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, श्री. मयूर दौंडकर, संदीप पाटील, संदीप शिंदे, भरत पवळे, दत्ताभाऊ टाकळकर, विठ्ठल परदेशी, नितीन सैंद पंढरीनाथ जरे, राहुलपवार, दत्ताभाऊ ढेरंग
संतोष घनवट, सचिन गायकवाड, माऊली राऊत, सागर लवटे, बाळासाहेब लोखंडे, सुधीर डावरे, विशाल आवटे, आकाश दौंडकर, राहुल मनोहर, गोविंद कांबळे, स्वप्निल दौंडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी परिपत्रक मागे न घेतल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

